प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - सिध्दार्थनगर येथील रहात असलेले आदिल संदिप काळे (वय 23) आणि प्रथमेश प्रकाश खाबडे (वय 21) यांचा रविवार दि.11/08/2024 रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास कागल येथे असलेल्या शाहु हायस्कूल जवळ NH-4 रोडवर मोटारसायकल घसरून खाली पडून जखमी झाल्याने त्यांना 108 या रुग्णवाहिकेतुन कागल येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,जखमी आदिल आणि प्रथमेश हे दोघे मोटारसायकल वरुन मित्राचे वडील वारल्याने शनिवार(दि.10) रोजी बेळगाला गेले होते.ते रविवारी (दि.11) रोजी परत येत असताना कागल येथे शाहु हायस्कूल जवळ रस्त्याचे काम चालू असल्याने त्या परिसरात खडी पसरली असल्याने समोरुन येत असलेला ट्रक आल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला घेत असताना खडीवर मोटारसायकल घसरून खाली पडून त्यात जखमी झाल्याचे समजले.या अपघाताची माहिती कागल पोलिसांना समजताच पोलिसांनी 108 रुग्णवाहिकेतुन दाखल केले.
----------------------------------------
सर्पाने दंश केल्याने सर्पमित्र जखमी.
कोल्हापूर - यळगूड येथील सर्पमित्र शंकर गणपती कुंभार (वय 70 ) हा रविवार दि.11/08/2024 रोजी दुपारी तीनच्या सुमारास रहात असलेल्या घरात सर्प पकडण्यासाठी गेला असता त्याला सर्पाने दंश केल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल .या घटनेची नोंद सीपीआर रुग्णालयात झाली आहे.
-----------------------------------
गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न.
कोल्हापूर - शिराळा तालुक्यातील मांगले येथील संदिप सर्जेराव देसाई (वय 40) यांनी रविवार दि.11/08/2024 रोजी दुपारी दोनच्या सुमारास रहात असलेल्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या नातेवाईकांनी गळफास सोडवुन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
-------------------------------------
विषारी औषध घेतलेली महिला उपचारास दाखल.
कोल्हापूर - गडहिग्लज येथे असलेल्या लिंगनूर गावातील रेखा रुद्रगोंडा शनिगोंडा (वय 35) यांनी रविवार दि.11/08/2024 रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास रहात असलेल्या घरात हमला नावाचे विषारी औषध सेवन केल्याने गडहिग्लज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.