प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - एकमेकांकडे बघण्याच्या कारणातुन सदरबाजार येथे दोन गटात मारामारी झाली.या मारामारीत तलवार ,खुरपे,काठ्या यांचा वापर करण्यात आला.या दोन्ही गटानी एकमेकांच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
यातील समीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत मित्र गौरव चोपडे आणि मी रविवारी रात्री जेवण करून सदरबाजार परिसरात असलेल्या अस्मत चिकन सेंटरच्या बाजूने जात असताना कट्टयावर बसलेले अमन मुजावर ,सादिक शेख ,जावेद शेख आणि सुभान शेख यांनी वाद घालत माझ्याकडे का पहातोस असे म्हणुन लाथा बुकक्यानी मारहाण करण्यास सुरूवात केली.या वेळी जावेद शेख यांने घरातुन खुरपे आणून डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.या प्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी चौघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच सादिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत भांडण मिटविण्यासाठी गेलेल्यावर प्रविण वाघमारे,गौरव चोपडे,सोन्या वाघमारे,विकी वाघमारे आणि प्रथमेश उर्फ पप्पू पवार यांच्यासह अन्य चार ते पाच जणांनी शिवीगाळ करुन काठीने मारहाण केली.या प्रकरणी पाच जणांच्यावर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.