पेठवडगांव येथे जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिसांचा छापा.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-  हातकण्ंगले तालुक्यातील पेठवडगांव येथे रहात असलेल्या भजने गल्लीतील  रमेश गणबावले यांच्या इमारतीत तीन पानी जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषन पथकाला असता या पथकातील पोलिसांनी गुरुवार दि.15/08/2024 रोजी  भजने गल्लीत बलराम कला क्रिडा आणि सांस्कृतिक मंडळ नावाने असलेल्या बंद खोलीत  सुरु असलेल्या तीन पानी  जुगार अड्डयावर छापा टाकून खेळत असलेल्या 54 व्यक्तीना ताब्यात घेऊन 2 लाख 26 हजार 710 रु.रोख रक्कमेसह 39 मोबाईल संच आणि जुगाराचा इतर माल असा एकूण 5 लाख 20 हजार 210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 54 जणांसह या क्लबचा अध्यक्ष आणि घरमालक अशा 56 जणांवर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार पेठवडगांव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई  पोलिस अधिक्षक  मा. महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषनचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,सहाय्यक पोलिस निरीक्षक सी.एस.मसुटगे ,पोलिस संजय देसाई,संजय पडवळ,बालाजी पाटील,वैभव पाटील आणि विजय इंगळे यांच्यासह आदीनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post