पेठवडगाव येथे तरुणाची आत्महत्या.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील पेठवडगाव येथील सुरेश भाऊसो अपराध (वय 45.रा.अपराधवाडी) यांनी सोमवार दि.12/08/2024 रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास हॉटेल समाधान शेजारी असलेल्या प्रकाश पाटील यांच्या पुट्टयाच्या गोडावून मध्ये छताच्या हुकास दोरीने गळफास लावून घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्याचा गळफास सोडवून  बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.यातील मयत सुरेश हा पुट्टयाच्या गोडावून मध्ये नोकरी करत होता.त्याच्या पश्च्यात पत्नी आणि एक मुलगा आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

Post a Comment

Previous Post Next Post