प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ बोरगाव येथील मनोहर राणोजी कांबळे (वय 63) यांनी शुक्रवार दि.09/08/2024 रोजी सकाळी अकराच्या सुमारास रहात्या घरात मळी नावाच्या शेतात स्पायडर नावाचे औषध सेवन केल्याने त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना तयार रात्री साडे आठच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
--------------------------------------
ब्लेडने स्वतःच वार करून जखमी.
कोल्हापूर - कनाननगर परिसरात रहात असलेल्या संदिप धनंजय कांबळे यांने शनिवार दि.10/08/2024 रोजी रहात्या घरात दुपारी दोनच्या सुमारास स्वतःच्या उजव्या हातावर ब्लेडने वार करून जखमी घेतल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
-------------------------------------
रोड अपघातात जखमी .
कोल्हापूर - सुभाषनगर परिसरातील कृष्णात महादेव पोळ (वय 36रा.साईमंदीर जवळ) यांचा शनिवार दि.10/08/2024 रोजी सकाळी साडे नऊच्या सुमारास शेंडा पार्क येथे असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे महाविद्यालय समोर अपघातात जखमी झाल्याने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.