गांजाचा साठा करून त्याची विक्री प्रकरणी दोघांना अटक करून दोन किलो गांजा जप्त.....स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे 

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे बेकायदेशीरपणे   गांजाचा साठा करून त्याची विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हें अन्वेशनच्या पोलिसांना मिळाली असता या पथकातील पोलिसांनी रविवार दि.18/08/2024 रोजी त्या परिसरात छापा टाकला असता गांजाची विक्री होत असल्याचे दिसून येताच संशयीत दोघांना सापळा रचून ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानी आपली नावे सुलेमान करीब शेख (वय 25 रा.बेघरवाडी ,विशाळगड) आणि चेतन विजय पोवार (वय 24.रा.गडमुडशिंगी ता.करवीर ) असल्याचे सांगून त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन किलो वजनाचा 46 हजार 800/ रु .किमंतीचा मुद्देमाल मिळुन आला.सदरचा गांजा जप्त करून त्यांनी सदरचा गांजा रमेश शिंदे उर्फ परीट (वय 50.रा.विक्रमनगर ,कोल्हापूर) याच्याकडुन घेतल्याचे सांगितले असता या तिघांच्या विरोधात गांधीनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post