45 हजारांची लाच घेताना अन्नसुरक्षा अधिकारी लाचलुचपत पथकाच्या ताब्यात.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर- कोगे येथे असलेल्या बेकरी व्यावसायिकाच्या कडुन 45 हजारांची लाच घेताना अन्नसुरक्षा अधिकारी विकास रोहिदास सोनवणे (वय 50 .रा.लाईफस्टाईल अपार्टमेंट ,प्रतिभानगर) याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून त्याच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मंगळवार(दि.20) करण्यात आली.

करवीर तालुक्यातील कोगे येथे बेकरी पदार्थ उत्पाकाच्या फर्मला 5 ऑगस्ट रोजी भेट देऊन तेथील तयार करण्यासाठी लागणारे जिन्नसाची नमुने घेऊन तुमच्या दुकानचा परवाना रद्द का करु नये.या प्रकारची नोटिस दिली.त्या नंतर या बेकरीचे व्यावसायिक सोनवणे यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे 85 हजारांची लाचेची मागणी केली त्यात तडजोड करून 45 हजार देण्याचे ठरवले.या तडजोडी नुसार 45 हजारांची लाच घेताना सोनवणे याला लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पकडून कारवाई केली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक बापू सांळुंखे ,सहा.पोलिस उपनिरीक्षक प्रकाश भंडारे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post