प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - लाइनबाजार परिसरात असलेल्या पिराची गल्लीतील शमशुद्दीन रसूल शेख (वय 70) यांच्या अंगावर शुक्रवार दि.02/08/2024 रोजी पहाटे पाचच्या सुमारास रहात्या घराची भिंत अंगावर पडल्याने जखमी झाले आहेत.त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,लाइनबाजार येथे पिराची गल्लीत शेख कुंटुबिय रहात असून त्यांच्या शेजारी एका घराचे बांधकाम चालू आहे.त्या घराची खुदाइ करताना आमच्याही हद्दीत खुदाई केल्याने भिंत पडल्याची शक्यता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.