तीन अल्पवयीन मुलासह दोघां मोटारसायकल चोरट्यांना अटक करून 2 लाख 10 हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - चोरीतील मोटारसायकल विक्री साठी आलेल्या ओंकार जालिंदर सिद (वय20) व ऋतुराज दमनाथ हेगडे (वय 21.रा.दोघे बेघर वसाहत,कागल यांच्यासह तीन अल्पवयीन मुलांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने  अटक करून त्यांच्या कडील दोन लाख 10 हजार रुपये किमंतीच्या सहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

अधिक माहिती अशी की,दोघे जण  चोरीतील मोटारसायकली शाहु टोल नाका परिसरात विक्री साठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली असता या पथकातील पोलिसांनी बुधवार दि.28 ऑगस्ट रोजी त्या परिसरात सापळा रचून विना नंबरची मोटारसायकल घेऊन आलेल्या पाच जणांना अडवून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कागल पोलिस ठाण्याच्या हद्दीतुन चार मोटारसायकल आणि गांधीनगर येथुन दोन मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

 ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर ,पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलिस महेंद्र कोरवी,प्रविण पाटील,विशाल खराडे,वैभव पाटील ,अशोक पोवार आणि राजू  कांबळे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post