अल्पवयीन मुलीवरचे अत्याचार थांबणार कधी ? पालकवर्गातुन विचारणा , पालक वर्गात घबराट.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - ठाणे जिल्हयातील बदलापूर येथे आदर्श विद्यालयात दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार केलेल्या त्या शाळेच्या कर्मचारयांवर कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी पालकवर्गासह नागरिकांच्यातुन होत आहे.त्या अत्याचार झालेल्या मुलीचे वय अवघं 3 वर्षे, चिमूरडी म्हणाली आई सुसूच्या जागी दुखतंय.. जेव्हा डॉक्टरकडे नेलं तेव्हा समजलं बलात्कार झालाय,ही चिमूरडी एकटीच नव्हती.आणखी एका चिमुरडीवर असाच प्रकार झाल्याचे समजते.

 हे  कृत्य घडलंय बदलापूर येथे असलेल्या आदर्श विद्या प्रसारक  शाळेत  अत्याचार करणारा त्या शाळेचा कर्मचारी अक्षय शिंदे असे त्याचे  नाव आहे .यांच्यावर पोलिसांनी कारवाईसाठी तत्परता दाखवली पाहिजे, नाहीतर आपल्याच जाती-धर्माचा म्हणून तुम्ही बाजू घ्याल तर उद्या तुमच्या  आमच्या  घरात या गोष्टी घडतील,म्हणून कितीही चांगलं वाटत असलं,दुसऱ्या जाती-धर्माची पीडित असली तरी अशा लोकांसाठी झेंडे घेऊन मोर्चे काढू नयेतं,सुटून आल्यावर  सुटले म्हणून जल्लोष करू नये,त्यांना हार फुले घालून पेढे वाटू नयेत,कारण तुम्ही जेव्हा अशा गोष्टी करता तेव्हा समाजात कुठेतरी हा  वेगळा संदेश जातो की आम्हाला वाचवायला आमच्यातीलच  राजकारण करणारे  किंवा राजकीय पक्षाचे अभय  मिळते असा अत्याचार करणाऱ्याचा समज होतो.आणि या प्रकरणात सुद्धा कारवाई करणाऱ्यांची  भूमिका महत्वाची ठरलीय,

गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी केवळ 12 तास उलटूनही गुन्हा नोंद केला नाही,केवळ टाळाटाळ केली.तरी बरं आहे पालकांवरच गुन्हा नोंदवला नाही.काही लोक तर आरोप करत आहेत की ,कारवाई करणारे  आरोपीशी हातमिळवणी करून  आपले साध्य साधत असल्याचे त्या पीडीत  कुटुंबाचं असं म्हणणं आहे,या अधिकाऱ्याला निलंबित न करता 'बदली' करून मोठी शिक्षा दिली असल्याचं समजलं.बाकी आपल्या राज्याचे गृहमंत्री कोण आहेत काय माहिती.शिक्षणमंत्री पण कोण आहेत? म्हणजे कुणीतरी असतीलच पण मला खरंच माहिती नाही, कारण अलिकडे कोण मंत्री बनतो कुणाचं सरकार कधी पडतं काहीच कळत नाही. बाकी अशावेळी एखादा खमक्या नेता असला पाहिजे अशी प्रकर्षाने जाणीव होते,जो अशावेळी व्यवस्थेला वाकवू शकेल न्याय मिळवून देण्यास भाग पाडेल, आता लोकांचा संयम सुटत चालला आहे,बदलापुरातील या शाळेची संतप्त लोकांनी तोडफोड केलीय,त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आणि व्हिडिओ मध्ये तर   कारवाई  करण्यारयानी कोणता बार काढ़ला  होता .हे समजू शकले नाही,पण संतप्त  जमावावर  कारवाई करत असलेल्यांनी  अशा प्रकारे कारवाई केलीय.यांना तर खरोखर मानलं पाहिजे.नंतर समजलं की या शाळेचे काय ट्रस्टी  हे सत्तेवर असलेल्या काही जणांशी संबंधित आहेत,मग म्हटलं ठीकच आहे पण एक बाप म्हणून मी स्पशेल  खच्चीकरण होऊन हरलेला एक हवालदिल बाप ठरलोय.

या लोकांसमोर आपलं काहीच चालत नाही,म्हणून सतत म्हणत असतो,आपण नागरिक म्हणून कायम विरोधी पक्षात असलं पाहिजे,आपल्यासाठी कुणी उभं राहत नाही मित्रांनो.उद्या अशी वेळ कुणावर न येवो,त्या पालकांना यातून सावरण्याचे बळ मिळो आणि त्या नराधमाने केवळ अत्याचार केला,चिमूरडीला छळ करून मारून टाकलं नाही याबद्दल त्याचे आभार मानावे की काय करावं अशी एक मनाची एक द्विधा मनस्थिती झालीय,बिचारी जीवंत तरी आहे.पण एक आहेच की तीच्या मनावर उठलेला हा ओरखडा आता आयुष्यभर विसरला जाणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post