अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यातील उत्पादक, हॉटेल्सच्या तपासण्या

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष मोहिमेमध्ये जिल्ह्यातील काही अन्न पदार्थ उत्पादक, कोल्ड स्टोरेज, घाऊक विक्रेते, हॉटेल्सच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये गंभीर त्रुटी आढळून आलेल्या व्यावसायिकांना अन्न उत्पादन व विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले असून अन्य व्यावसायिकांना त्यांच्याकडे आढळलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने सुधारणा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तु. ना. शिंगाडे यांनी दिली आहे.


मोहिमेमध्ये भारत बेकर्स कोल्हापूर, दिपक चिवडा, कोल्हापूर, नारायणी ग्रोसरीज कोल्हापूर, सागर बेकरी हरोली शिरोळ, आनंद स्वीट्स ताकवडे शिरोळ, महालक्ष्मी साल्ट सरनोबतवाडी करवीर, महाराष्ट्र फुड्स वारणानगर पन्हाळा, महालक्ष्मी ट्रेडर्स वाठार, हातकणंगले इत्यादी उत्पादक तसेच हॉटेल कसवा हिल्स कोल्हापूर, हॉटेल टेरेस ग्रील्स कोल्हापूर, हॉटेल देहाती कोल्हापूर, हॉटेल परख कोल्हापूर, हॉटेल श्लोक कोल्हापूर, हॉटेल जुना सात बारा, हॉटेल व्हॅली व्ह्यू पन्हाळा इत्यादी हॉटेल्सच्या तपासण्या करण्यात आल्या असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

 ही मोहीम कायमस्वरूपी राबविली जाणार असून जिल्ह्यातील अन्न व्यासासायिकांनी अन्न सुरक्षा व मानके काय‌द्याच्या तरतुर्दीचे पालन करुनच व्यवसाय करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post