प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - विशाळगड परिसरात असलेल्या ठिकाणचे अतिक्रमण काढ़ण्यासाठी गेलेल्यांनी जाळपोळसह तोडफोड केलेल्या 17 जणांना न्यायालयाने मंजूर करून फोटोत दिसत असलेल्या 7 जणांचा जामीन अर्ज फ़ेटाळण्यात आला.यात सुरज माणिक पाटील (वय 29),ओंकार दादा साबळे (वय21) ,चेतन आंनंदराव जाधव (वय 30),आदित्य अविनाश उलपे (वय29),ओंकार तुकाराम चौगले (वय 21 रा.सर्व.क.बावडा ) व सिध्दार्थ धोंडिबा कटकधोंड ( वय 30. जवाहरनगर ) यांचा जामीन अर्ज नामंजूर केलेल्यात समावेश आहे.
या संशयीताच्या वतीने Ad.सागर शिंदे,Ad.अभिजीत देसाई,Ad.धनंजय चव्हाण आणि Ad.केदार मुनीश्वर यांनी काम पाहिले असून सरकार पक्षाच्या बाजूने Ad. समीर तांबेकर व Ad.पी.जी.जाधव यांनी काम पाहिले.
या झालेल्या सुनावणीत पीडीताचे वकील Ad. अफरोज मुल्ला यांनी काम पाहिले .त्यांनी बाजू मांडताना घटना स्थळी असलेल्या संशयीताचे फोटो आणि व्हिडीओ फुटेज न्यायालयात सादर केल्याने त्या 7 जणांचा जामीन अर्ज फ़ेटाळण्यात आला.याचा तपास शाहुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी विजय घेरडे यांनी तपास करताना संशयीताचे लोकेशन सादर केले.