प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कंळबा जेल मध्ये गेल्या महिन्यापासून सुरक्षारक्षकांनी 46 मोबाईल शोधून काढले आहेत.हे सापडलेले सर्व मोबाईल बुधवारी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.या मोबाईलची किंमंत अंदाजे पस्तीस हजार रुपये आहे.जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे हे तपास करीत आहेत.
कंळबा जेल मध्ये असलेल्या कैद्यानी सुरक्षारक्षकांची नजर चुकवून कंळबा जेलात नेलेले 46 मोबाईल तुरुंगाधिकारी यांनी शोध घेऊन ते सर्व मोबाईल जुना राजवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.कारागृह प्रशासनाने शोध मोहिम राबवून हे मोबाईल जप्त करण्यात आले.आता हे मोबाईल ज्या कैद्याने वापरले त्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे.या जेलचे तुरुंगाधिकारी अविनाश जयसिंग भोई (वय 42 रा.कारागृह क्वॉर्टर्स ,कंळबा) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.या जेल मध्ये अनेक गैरप्रकार घडत आहेत.अंमली पदार्थां पासून गांजा ,मोबाईल पोच करणारी टोळी कार्यरत असल्याचे समजते.महिन्यापूर्वी मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराचा गांजाच्या आर्थिक वादातुन जेल मध्ये खून करण्यात आला होता.यापूर्वी जेलात अनेक गैरप्रकार घडले असून जेलच्या ढ़िसाळ सुरक्षा यंत्रणेमुळे या गोष्टी वारंवार घडत असल्याने 14 कर्मचारी यांना दोषी ठरवून त्यांना निलंबीत केले होते.
सध्या या जेलची सुरक्षेत वाढ़ करण्यात आली असून याचा पदभार प्रभारी अधीक्षक विवेक झेंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.कैद्याच्या खोलीची दररोज तपासणी करून त्याच्या साहित्याची तपासणी केली जाते पण काही हाती लागत नाही.पण कैद्याचे स्नानगृह,स्वच्छता गृहात लपवून ठेवलेले मोबाईल सापडतात पण यातील सिम सापडत नसल्याने मोबाईलचा वापर कुणी केला याचा थांगपत्ता लागत नाही.