प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कागल तालुक्यातील नानीबाई चिखली येथील मनोज सदाशिव मोर्डे (वय 44.रा.सध्या विराज सिटी ,कागल) हे आपल्या मित्रा समवेत रविवार दि.04/08/2024 रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास मित्रा समवेत कागल येथे असलेल्या पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते.मनोज याला पोहत असताना दम लागल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.या घटनेची नोंद कागल पोलिस ठाण्यात झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मनोज हे उद्योजक असून त्याचा खताचा व्यवसाय असून गोकुळ शिरगाव येथे कारखाना आहे. कागल येथे पाझर तलावाचे नुतिनीकरण करून या ठिकाणी कृत्रिम धबधबा करण्यात आला आहे.हे पहाण्यासाठी येथे प्रर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.आज रविवार असल्याने मनोज मोर्डे हे आपले मित्र सागर देवर्षी (रा.कागल) आदिलशहा नाईक (रा.नानीबाई चिखली),राजू मुल्ला व चंद्रकांत खवरे (रा.कोडणी) हे सर्व जण सकाळी कागल येथे एका हॉटेल मध्ये नाष्टा करून धबधबा पाहण्याचे ठरविले.फ्रेंडशिपच्या निमित्ताने सर्व मित्र एकत्र येऊन कागल येथे असलेल्या पाझर तलाव येथे नवीन केलेला कृत्रिम धबधबा पाहण्यासाठी गेले होते.पाहुन झाल्यावर सर्व जण तलावाच्या काठावर आले .धबधब्यांत भिजल्यामुळे मनोज यांना अंघोळ करण्याची इच्छा झाली.त्यांनी तलावात दोन-तीन वेळा उड्या मारल्या.मनोज हा पोहत होता. त्या वेळी सर्व जण बंधारयावर बसून धबधबा येथे काढ़लेले फोटो आणि व्हिडीओ पाहण्यात दंग होते.मनोज बराच वेळ न दिसल्याने सर्व जण त्याचा शोध घेऊ लागले.या वेळी चंद्रकांत खवरे यांनी मनोज फाउंटन कारंजाच्या बाजूने पोहत जाऊन परत येत असल्याचे पाहिले होते.त्या नंतर दिसेनासा झाला.तलावाच्या काठावर काही अंतरावर मनोज दम लागून तो बुडाला.बुडाल्याची माहिती समजताच तेथे नागरिकांची गर्दी झाली होती.या वेळी तलावावरील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले.त्या वेळी अशोक माने,शिक्षक तानाजी पाटील यांना बोलावले.त्यांना अमोल आंबी व नितेश कांबळे यांनी मदत केली.काही वेळाने मनोज याचा मृतदेह अशोक माने यांच्या निदर्शनास आला असता त्यानी पाण्याबाहेर काढ़ला.मृतदेह शवविच्छेदनासाठी कागल येथे रुग्णालयात नेण्यात आला.त्यांच्या पश्च्यात पत्नी ,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
पोहण्यासाठी गेलेल्या मनोजवर मित्रासमोरच फ्रेंडशिप डेच्या दिवशी काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
यातील मयत मनोजच्या मुलांना अशोक माने यांनी पोहण्यास शिकवले असून त्यानीच मनोजचा मृतदेह पाण्या बाहेर काढ़ला.ज्या मुलांना पोहण्यास शिकविले त्यांच्या पालकांचा मृतदेह पाण्याबाहेर काढ़ण्याची वेळ या शिक्षकावर आली.