कोल्हापूर शहर या घटनेने हादरले.
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - शिये येथे रहात असलेल्या 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा गुरुवार दि.22/08/2024 रोजी दुपारी बाराच्या सुमारास शिये येथील रामनगर येथे असलेल्या पटकुडी नावाच्या ओढ़यात दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढ़ळला.पीडीत मुलीच्या नातेवाईकांने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले.सदरची पीडीत मुलगी बिहार राज्यातील असून ती आपल्या कुंटुबिया समवेत उदरनिर्वाहा साठी कोल्हापूरात रहात होती.या घटनेचा तपास पोलिसांनी जलद गतीने करून दिनेश केशनाथ साह (वय 25) या नराधमास अटक केली.
अधिक माहिती अशी की ,यातील पीडीत मुलगी रा.सबार जि.कैमुर बिहार राज्यातील असून तिचे आई वडील गेल्या तीन वर्षांपासून शिये येथे वास्तव्यास आहेत.ते रत्ना उद्योग फौंड्री येथे नोकरीस आहेत.बुधवारी तिचे आई वडील कामाला जात असताना घरी असलेल्या दिनेश साह ह्या नातेवाईकाला मुलीच्याकडे लक्ष देण्यास सांगून ते कामाला गेले त्या वेळी मुलीचा मामा झोपला होता.पीडीत मुलीची आई घरी आल्यानंतर मुलगी घरी नसल्याचे पाहुन त्या नातेवाईकाकडे चौकशी केली असता त्याने मी रागावल्याने येथेच कुठे तरी गेल्याचे सांगितले. तिचा शोध घेत असताना सदर मुलगी सापडत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाली असल्याची तक्रार दाखल केली.पोलिस घटना स्थळी जाऊन माहिती घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने पहाटे प्रर्यत शोध घेतला पण ती मिळून आली नाही.
गुरुवारी (दि.22) सकाळी श्वान पथकाला बोलावून घेऊन श्वानाने माग काढत घरा पासून काही अंतरावर असलेल्या हरदासकी नावाच्या ओढ़यात पीडीत मुलीचा मृतदेह आढ़ळला .सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात हलविला .घटना स्थळी मुलीच्या चप्पलासह त्या वेळी वापरलेले कपडे आढ़ळले तिच्या अंगावर ओरखडल्याच्या खुणा होत्या.तिचे शवविच्छेदन डॉक्टरांच्या चार टिमने केले असून तिच्या लैंगिक अत्याचार करून तिला लाथा बुक्यांनी मारुन तिचा गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे -पाटील ,करवीरचे उपअधीक्षक क्षीरसागर,स्थानिक गुन्हें अन्वेषनचे रविंद्र कळमळकर ,शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांनी अवघ्या आठ तासात या घटनेचा तपास करून आरोपीला अटक करून कारवाई केली.दाखल करण्यात आले असता तिचा उपचारा पूर्वी मृत्यु झाला.या घटनेची माहिती पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यासह लक्ष्मीपुरी पोलिस स्टाफ मोठ्या संख्येने शवविच्छेदन विभागा जवळ तैनात करण्यात आला होता.
या घटनेने कोल्हापूर शहर हादरुन गेले.या घटनेची माहिती समजताच उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी संजय पवार ,विजय देवणे यांच्यासह कार्यकर्त्यानी सीपीआर चौकात निदर्शने करून शवविच्छेदन आवारात घोषणा बाजी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणाजी करीत गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करत आरोपीला कडक शिक्षेची मागणी करण्यात आली.या वेळी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करून वरिष्ठ पोलिस अधिकारी हजर होते.