प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील रुई येथील सचिन बाबासो कांबळे (वय 38.) याचा शुक्रवार दि.16/08/2024 रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास रुई येथील साठेनगर येथे झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी प्रथम हातकंणगले येथे असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढ़ील उपचार इंचलकरंजी येथे आयजीएम रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याच्यावर उपचार चालू असताना शनिवार दि.17/08/2024 रोजी पहाटे सव्वा चारच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की यातील मयत सचिन आणि साठेनगरातील तरुणांच्यात गेल्या वर्षापासून अंतर्गत वाद असल्याचे समजते.तो वाद मिटविण्यासाठी गेले हल्लेखोरांनी सचिन याला बोलावले होते. यावेळी सचिन काही तरुणांना सोबत घेऊन गेल्याचे समजते.
सचिन याच्यावर अगोदरच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी सचिन याला लाथा बुक्यांनी जबर मारहाण करून हल्लेखोर पळुन गेले.जखमी सचिन याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यु झाला.त्याच्या मृत्युची बातमी रुई गावात समजताच त्याच्या नातेवाईकांसह समाजातील स्त्री पुरुष मोठ्या संख्येने सीपीआर आवारात गर्दी करून जो प्रर्यत हल्लखोरांना ताब्यात घेऊन अटक करीत नाही.तो प्रर्यत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला.याची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना समजताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्री.दिलीप पवार यांनी आपल्या पोलिस स्टाफसह सीपीआर आवारात दाखल होऊन मृताच्या नातेवाईकाची भेट घेऊन घटनेची माहिती घेत जमावाला शांतता राखण्याचे आव्हान केले.या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.