प्रेस मीडिया लाईव्ह :
विश्व हिंदू परिषद बजरंग दल इचलकरंजी यांच्या9 सहकार्याने शेळके भवन, इचलकरंजी येथे पूरग्रस्त लोकांसाठी निवास, नाष्टा ,चहा, भोजनाची अगदी उत्तम रीतीने सोय करण्यात आलेली आहे . पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी काल दिनांक 31 जुलै रोजी सदर ठिकाणी भेट देऊन त्यांच्या असणाऱ्या समस्यांच्या विषयी माहिती घेतली. त्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांचे कार्य अगदी उत्तम रीतीने दिसून आले . काळी नाश्ता , चहा ,दुपारी -भोजन ,चार वाजता चहा -बिस्किटे ,रात्री उत्कृष्ट भोजनाची सोय करण्यात आलेली आहे.
पूरग्रस्त लोकांची शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम राहण्यासाठी दिवसभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचेही नियोजन करण्यात आलेले आहे , सकाळी भजन- कीर्तन ,दुपारी लहान मुलांच्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम , संध्याकाळी -सत्संग ,महिलांच्यासाठी विविध व्याख्याने , आरोग्य तपासणीची सोय . विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या माध्यमातून खूप चांगल्या रीतीने शेळके भवन येथे खूपच उत्कृष्टपणे कार्य सुरू आहे.
समाजातील सर्व क्षेत्रातील लोकांच्याकडून विश्व हिंदू परिषद व बजरंग दलासाठी सहकार्य सुद्धा करण्यात येत आहे .खरच त्यांचे कार्य बघून मन भारावून गेले . पश्चिम महाराष्ट्र पोलीस मित्र परिवार समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी भेट दिली. त्यांनी आम्हाला पूरग्रस्त छावणीला भेट देण्याची संधी उपलब्ध करून देऊन अगदी उत्तमपणे सहकार्य केले .त्याबद्दल विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व सदस्यांचे पोलीस मित्र समन्वय समितीद्वारे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.यावेळी सुजित कांबळे [जिल्हामंत्री ,विश्व हिंदू परिषद ] श्री सोमेश्वर वाघमोडे, अमित कुंभार [ बजरंग दल जिल्हा संयोजक ]सर्जेराव कुंभार , प्रवीण सामंत, मुकेश चोथे तसेच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते ....
पोलीस मित्र समन्वय समितीच्या महाराष्ट्राच्या कार्याध्यक्षा -डॉ.श्वेता चौगुले, पश्चिम महाराष्ट्राचे सल्लागार- डॉ. संभाजी भोसले ,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष- शाहीन चौगुले इचलकरंजीचे शहराध्यक्ष- श्री अशोक पुरोहित ,हातकणंगले अध्यक्ष- निगार मुजावर इचलकरंजी उपाध्यक्ष -गणेश चोळके, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष -शोभा वसवाडे ,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.