विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांची कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहास भेट

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : पुणे कारागृह व सुधारसेवाचे विशेष पोलीस महानिरीक्षक (मु) डॉ.जालिंदर सुपेकर  यांनी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. कारागृह  परिसरामध्ये वृक्षारोपन करुन कारागृह सुरक्षेचा आढावा घेतला. मुख्यालयामार्फत या कारागृहास देण्यात आलेले टि.व्ही संच, ॲलन फोन, ई प्िक्झन व्हिडीओ कॉन्फरंसिग मुलाखतकरीता संगणक संच, वॉशिंग मशीन, वॉकी-टॉकी, किवॉस मशिन, झेरॉक्स मशिन इत्यादी वस्तू कार्यान्वीत केलेल्या आहेत किंवा नाही याची पहाणी केली. तसेच ॲलन फोन, ई प्रिाझन व्हिडीओ कॉन्फरंसिग मुलाखत या सुविधेचा लाभ कारागृहातील बंदी कशा प्रकारे घेत आहेत यांची प्रत्यक्ष पाहणी करुन बंद्यांच्या अडीअडचणी विचारुन त्यांचे मार्गदर्शन केले.

यावेळी कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे,  उपअधीक्षक पांडूरंग भुसारे,  वैद्यकीय अधिकारी स्मिता महाडीक,  वरिष्ठ  तुरुंगाधिकारी चंद्रशेखर देवकर,  तुरंगाधिकारी श्रेणी-1 शैला वाघ व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post