रात्री उशिरा पर्यन्त बार चालू असल्याने बार मालकांवर कारवाई.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कदमवाडी परिसरात असलेल्या लार्वी कॉकटेल / किचन बार रात्री उशिराप्रर्यंत चालू ठेवल्याने पोलिसांनी बार मालक आकाश वसंत देशमुख (वय 40.रा.नागाळापार्क) यांच्यावर तेथील नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याची फिर्याद पोलिस कॉ.सचिन सदाशिव सातपुते यांनी  दिली.

कदमवाडी परिसरात असलेल्या पुण्यपर्व को -ऑप.हाऊसिंग सोसायटीत असलेल्या रहिवाशांनी बारला मंजुरी मिळू नये म्हणून जिल्हाधिरी कार्यालयसह राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.या तक्रारीच्या निमीत्ताने महापालिकाने जाहिरात प्रसिद्ध करून हरकती मागविल्या होत्या.   त्यानुसार त्या परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शवला असताना जिल्हाधिकारी यांनी बारला परवानगी दिल्याचा आरोप त्या परिसरातील नागरिकांनी केला आहे.शुक्रवारी रात्री उशिराप्रर्यंत बार चालू ठेवून शांतता भंग केल्या बद्दल पुण्यकर्म अपार्टमेंट मधील नागरिक सतीशचंद्र कांबळे,प्रमोद उनऊणे ,डॉ.दिनेश वाळवेकर ,गणेश शिंदे नंदलाल कुमावत यांनी शाहुपुरी पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता घटना स्थळी जाऊन बार मालक याला ताब्यात घेऊन कारवाई केली.परत जर बार उशिराप्रर्यत सुरु ठेवून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post