प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील बहिरेश्वर येथे रहात असलेल्या सरीता अमर दिंडे (वय 33) यांनी शुक्रवार दि.02/08/2024 रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास ग्रामोझोन नावाचे विषारी औषध सेवन केले होते.त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे उपचार चालू असताना तयार रविवार दि.04/08/2024 रोजी पावणे चारच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत या मनोरुग्ण असून त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.त्यांच्या पश्च्यात पती,एक मुलगा ,एक मुलगी ,आई वडील आणि सासू सासरे आहेत.