प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कागल तालुक्यातील क.सांगाव येथे रहात असलेला सचिन विठ्ठल चव्हाण (वय 30.रा.वाकी वसाहत,क.सांगाव) याने मंगळवार (दि.23 जुलै) रोजी सायंकाळी चारच्या सुमारास रहात्या घरात दारुचे नशेत ग्रामोझोन नावाचे विषारी औषध सेवन केले होते.त्याच्या नातेवाईकांनी उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते.तेथे उपचार चालू असताना सोमवार दि.05/08/2024 रोजी सायंकाळच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
त्याच्या पश्च्यात पत्नी , एक मुलगा,एक मुलगी आणि आई वडील असा परिवार आहे.
--------------------------------------
लोखंडी शिडी वरुन पाय घसरून पडल्याने जखमी.
कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील मनपाडळे येथील विरेंद्र यादव (वय 35) हा सोमवार दि.05/08/2024 रोजी सकाळी साडे आठच्या सुमारास मनपाडळे येथे असलेल्या जुगाई स्टोन क्रशर वर साफ सफाई करण्यासाठी गेला असताना लोंखडी शिडी वरुन पाय घसरून पडल्याने त्याच्या डोकीस मार लागून जखमी झाल्याने त्याला 108 या रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेला नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.