कोल्हापूरसह बदलापूर आणि कोलकत्ता येथे झालेल्या अत्याचार प्रकरणी प्रत्येक शाळेत समुपदेशन करण्याची गरज.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.मुंबई यांची जिल्हाधिकारी अमोल येड़गे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.एस .कार्तिकेयन  यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापुरातील शिये येथे झालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून तसेच कोलकत्ता येथे निवासी वैद्यकीय महिला डॉक्टरवर अत्याचार करून झालेला खून आणि बदलापूर येथे दोन लहान अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारांच्या घटनेत होत असलेली वाढ़ ही पालकवर्गात एक चिंताजनक बाब असून याला आळा बसण्याची गरज आहे."लेक वाचवा ,लेक शिकवा "   ही घोषणा हवेतच असल्याचे वाटत आहे.याला कडक कायदा करून त्यांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.या साठी सोमवार दि.26/08/2024 रोजी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.मुंबई.या कोल्हापुरातील जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाधिकारी श्री.अमोल येडगे यांना निवेदन देण्यात आले.या कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष श्री.चंद्रकांत पाटील यांनी आपले म्हणणे मांडताना छत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्यात लेकी -सुनांचा सन्मान केला जात होता.पण आताच्या काळात आपल्याच लेकी,सुनावर अन्याय -अत्याचाराच्या घटना घडत आहेत.या साठी प्रत्येक शाळेतील शिक्षकासह विद्यार्थी आणि पालकांचे समुपदेशन होणं आवश्यक आहे.यामुळे अशा घटना रोखण्यात काही प्रमाणात मदत होईल.

या वेळी पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्रेयश भगवान,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णात चौगुले ,सचिव सुरेश पाटील,कार्याध्यक्ष दत्तात्रय बोरगे शहराध्यक्ष प्रमोद व्हनगुते,रुपाली चव्हाण ,सुरेखा शेजाळे,बाळासाहेब कोळेकर ,मधु धनवडे ,मदन अहिरे ,नाझ अत्तार     आकाश कांबळे ,निरंजन कामत,Ad.प्रमोद दाभाडे आणि मुरलीधर कांबळे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post