डोक्यात हातोडा मारल्याने युवक जखमी.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : मालमत्तेची वाटणी करून  सामाईक जागेतील स्वच्छतागृह काढून घेण्यासाठी झालेल्या वादातून पुतण्या व चुलता यांच्यात वाद झाला. यावेळी काका व चुलत भावाने नितीन राजेंद्र जगताप (वय ३४ रा.संतोष कॉर्लनी,सानेगुरुजी वसाहत) याच्या डोक्यात हातोडा मारल्याने तो  जखमी झाला.हा प्रकार  सोमवारी (ता. १९) दुपारी दोनच्या सुमारास या बाबतची फिर्याद जखमी नितीन यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली. दिलेल्या फिर्यादीनुसार काका प्रकाश अर्जुन जगताप व चुलत भाऊ समर्थ प्रकाश जगताप (दोघे रा. सानेगुरुजी वसाहत) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

   संशयीत आरोपी फिर्यादी यांच्या जागेतील स्वच्छतागृह काढून घेत नसल्याने त्यांच्यात वारंवार वाद होत होता. याच वादातून सोमवारी दुपारी काकाने आपल्याच पुतण्यावर हल्ला केला.

-----------

मारहाणीत पती -पत्नी जखमी.

कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उचगाव येथील आंबेडकर चौकात झालेल्या मारहाणीत अनिल विश्वास चौगुले (वय ६०) व त्यांची पत्नी मीना अनिल चौगुले (वय ५०) हे दोघे जखमी झाले.हा प्रकार  रविवार (ता. १८) रोजी रात्री साडे नऊ वाजता हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

-----------------

    गरम पाण्यात पडून बालिका भाजून जखमी.

कोल्हापूर : अंघोळीसाठी पातेल्यात पाणी गरम केले होते. या पातेल्यावर पडल्याने नऊ वर्षाची फैजलीन तौफिक शेख (रा. शेवटचा बस स्टॉपजवळ, लक्षतीर्थ वसाहत) ही भाजून जखमी झाली. सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. नातेवाईकांनी तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केले आहे. सीपीआर पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे.

-------------

  अनोळखी बेवारस वृध्दाचा मृत्यू

कोल्हापूर : मध्यवर्ती बस स्थानक परिसरात रस्त्याकडेला पडलेला अशोक पवार (वय ६०) या बेवारस वृध्दास नागरीकांनी सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. ६ ऑगस्ट पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवार १९ रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या नातेवाईकांबाबत काहीच माहिती समजलेली नाही. सीपीआर पोलीस चौकीत बेवारस म्हणून नोंद झाली आहे.

--------------

Post a Comment

Previous Post Next Post