क्रशटोन क्रेशर येथे काम करीत असताना व्हिएसआय मशीन मध्ये पडल्याने एकाचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर  - हातकंणगले तालुक्यातील लाटवडे येथे रहात असलेले जनार्दन दगडू निर्मळे (वय 57) हे गुरुवार दि.01/08/2024 रोजी सव्वा तीनच्या सुमारास हनुमान क्रशस्टोन क्रशर येथे काम करीत असताना व्हिएसआय मशीन मध्ये पडल्याने त्यांना बेशुध्दावस्थेत उपचासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

---------------------------------------- 

  तरुणाची आत्महत्या.

कोल्हापूर - जुना बुधवार पेठेतील विनायक महादेव रेडेकर यांने गुरवार दि.01/08/2024 रोजी 

 रहात्या घरात लोखंडी पाईपला टॉवेलने गळफास लावून घेतल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

---'-------------------------------------

 तरुणाचा गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न.

कोल्हापूर - सुभाषनगरातील सागर प्रकाश पोवार (वय 36) याने बुधवार दि.31/07/2024 रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास रहात्या घरात गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळफास सोडवून त्याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post