प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील तामगाव येथे रहात असलेला संकेत संजय कदम (वय 19) याने रविवार दि.04/08/2024 रोजी दुपारी अडीचच्या सुमारास रहात्या घरात लोखंडी पाईपला साडीने गळफास लावून आत्महत्या केली.या घटनेची नोंद गोकुळशिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे.
यातील मयत संकेत हा कोल्हापुरात एका कॉलेज मध्ये शिकत होता.त्याच्या पश्च्यात आई वडील आणि दोन विवाहित बहिणी आहेत.त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.
Tags
कोल्हापूर