प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - एका पतसंस्थेचे कर्मचारी गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा टंच काढ़ण्यासाठी गुजरीत आले असता अनोळखी दोघां तरुणानी सोन्याची वळी बघण्यासाठी घेऊन पलायन केलेल्या जुना राजवाडा पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्या कडील 307gm. वजनाचे सोने आणि मोटारसायकल असा साडे तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अशी माहिती जुना राजवाडाचे पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी दिली.हा प्रकार 7 जून रोजी घडला असून जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणी पोलिसांनी गणेश निवास खोचरे(वय 26.रा.वनवासाचीवाडी ,सातारा) आणि अक्षय सुनिल कुरणे (वय 26.रा.किणी ,ता.हातकंणगले) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.पतसंस्थेतील कर्मचारी अल्लाबक्ष मुल्ला (वय 53.रा.बांबवडे) यांनी फिर्याद दिली होती.
शाहुवाडी तालुक्यात बांबवडे गावात ही पतसंस्था असून या पत संस्थेत संजय लक्ष्मण चव्हाण यांनी सोन्याचे दागिने गहाण ठेवले होते.7 जूनला टंच काढ़ण्यासाठी गुजरी येथे सराफाकडे आणले होते.त्या दागिण्यांची वळी करून गावी जाणार होता .मात्र गुजरीत आलेले गणेश व अक्षय यांनी बघण्यांच्या बहाणा करून हातात घेऊन ते बोलत दुकानाच्या पायरी जवळ येऊन मोटारसायकल वरुन सोन्याची वळी घेऊन पोबारा केला होता.हा तपास जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गळवे यांच्यासह त्यांच्या पोलिस कर्मचारी यांनी केली.