ऐतिहासिक दसरा चौकातील खा.धनंजय महाडिक युवाशक्तीची दहीहंडी गडहिग्लजच्या संघर्षग्रुपच्या गणेश कांबळे या गोंविदाने फोडली.

 पालकमंत्री मा.मुश्रीफसो यांनी केलेले दहीहंडीच्या निकालाचा एक्झिट पोल खरा ठरला.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -ऐतिहासिकि दसरा चौकातील मानाची तीन लाखांची दहीहंडी कोण फोडणार याकडे जमलेल्या लाखों लोकांचे लक्ष लागून राहिले होते.या सोहळ्यात कोल्हापूर जिल्ह्यातुन आलेल्या सात गोविंदा पथकांनी भाग घेतला होता. मंगळवार (दि.27) रोजी दसरा चौकात खा.धनंजय महाडिक युवाशक्तीची तीन लाख रुपये बक्षीस असलेली दहीहंडी शेवटी गडहिग्लजच्या संघर्ष ग्रुपने सात थर रचून मिळालेल्या संधीचे सोने केले.

खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते विजेत्या गोंविद पथकाला गौरविले.यात खरी बाजी मारली त्यांच्या ग्रुपच्या सर्वात वरती असलेल्या गणेश कांबळे यांने संयम राखत मोठ्या कौशल्याने दहीहंडी फोडून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.याचा ही सत्कार यावेळी करण्यात आला.आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते प्रत्येक सहभागी संघाला दहा हजाराचे बक्षीस देण्यात आले.प्रथम कृष्ण मृर्तीची पुजा करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढ़वून सुरवात झाली.


खा.धनंजय महाडिक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून आपल्या मनोगत या दहीहंडीच्या निमीत्ताने प्रचाराचा शुभारंभ करून दहाच्या दहा जागा निवडून देण्याचे नागरिकांना आव्हान केले.या पालकमंत्री यांनी आपल्या भाषणात महाडिक कुंटुबियाचे कौतुक करून त्यांनीही जनतेला दहाच्या दहा जागा निवडून देण्याचे आवाहन केले.शेवटी जाता-जाता मुन्ना साहेब आमच्या मतदार संघातीलच गोंविदा पथक विजयी होणार असे स्पष्ट केल्याने उपस्थित मान्यवरांत हास्यांचे फवारे उडाले .पालकमंत्री यांचा विश्वास सार्थ ठरवत संघर्ष ग्रुपने बाजी मारली.

या वेळी पालकमंत्री मा.हसन मुश्रीफसो, खा.धनंजय महाडिक, राज्यनियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर,मा.आम.महादेवराव महाडिक,खा.संजय मंडलीक,मा.आ.सुरेश हाळवणकर ,अरुधंती महाडिक ,पृथ्वीराज महाडिक,आयकॉन कृष्णराज महाडिक,विश्वराज महाडिक ,अमल महाडिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post