प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - मोरेवाडी परिसरातील वर्षानगर येथे रहात असलेला शैलेश लक्ष्मीकांत माने (वय 15.सध्या रा.गुरुदत्त कॉलनी मोरेवाडी) याने रविवार दि.18/08/2024 रोजी सकाळच्या सुमारास रहात असलेल्या छताच्या पंख्याला पिवळ्या रंगाच्या ओढ़णीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी सव्वा अकराच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,शैलेश हा आठवीच्या वर्गात शिकत असून तो आपल्या वडीलांची दुचाकी चालवित होता.ती दुचाकी पडल्याने वडील आता आपल्यावर रागवतील या भीतीने हे कृत्य केले असण्याची शक्यता काहीनी बोलून दाखवली.त्याच्या पश्च्यात आई वडील आणि एक बहीण आहे.