विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यु.

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील हेर्ले येथील ओंकार बाबासो खुरपे (वय 23.रा.माळभाग मराठी शाळेजवळ,हेर्ले) हा गुरुवार दि.29 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सातच्या सुमारास रहात्या घरासमोर पाण्याची मोटर चालू करीत असताना अचानक शॉक लागून बेशुध्द झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा साडे नऊच्या सुमारास उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,ओंकार यांच्या नवीन घराचे बांधकाम चालू आहे.घरासाठी काढ़लेल्या खड्डयातील साठलेले पाणी काढ़ण्यासाठी विजेची मोटर चालू केली असता त्या खड्डयातील पाण्यात वीज उतरल्यामुळे त्याला विजेचा जोरात शॉक लागल्याने जागेवर कोसळून बेशुध्द झाला.हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच प्रथम खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा मृत्यु झाला.

 ओंकार गेल्या दोन वर्षांपासून वैद्यकीय प्रतिनीधी म्हणून काम करीत होता.तो कष्टाळू आणि मनमिळाऊ असल्याने त्याच्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला मोठा धक्का बसला.त्याच्या पश्च्यात आई वडील आणि बहिण आहे.

---------------------------------------------------------------------

गव्याने दिलेल्या धडकेत जखमी झालेल्याचा मृत्यु.

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे येथील बळवंत सखाराम शेटके (वय 50) हे बुधवार (28) रोजी सकाळी सातच्या सुमारास शेतात काम करीत असताना त्यांना गव्याने जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तेथे उपचार चालू असताना गुरुवार दि.29/08/2024रोजी सकाळच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post