वृत्तपत्र विक्रेत्या सौ.संगीता कांबळे यांना आदर्श उद्योजिका गौरव पुरस्कार प्रदान.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्युज एक्सप्रेसच्या राज्यस्तरीय  पुरस्कार सोहळा रविवार दि.25ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.मुंबई.येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात सौ.संगीता मुरलीधर कांबळे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांनी आपल्या  वृत्तपत्र व्यवसायाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची केलेल्या कामाची  दखल घेऊन त्यांना आदर्श उद्योजिका गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

या झालेल्या आगळ्या वेगळ्या पुरस्काराने आनंद व्यक्त करुन पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक श्री.मेहबुब सर्जेखान यांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रसाद कुलकर्णी, प्रमुख पाहुणे ज्येष्ट  पत्रकार सागर बोरांडे , संपादक श्री दीपक ढवळे , ज्येष्ट संपादक श्री डी एस शिंदे , श्री .फिरोज मुल्ला सर ,श्री.संतोष जंगम    ( स्वामी ) प्रमुख उपस्थिती सौ. प्रमोदिनी मारुती माने यांच्यासह  इतर मान्यवर आणि श्रीकांत कांबळे ( उपसंपादक ) कोल्हापुर जिल्हा प्रतिनिधी  श्री.मुरलीधर कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post