प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथे असलेल्या हॉटेल ग्रीन फिल्ड़ नजीक बोलेरो गाडी आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या धडकेत कपिल आकाराम माने (वय 30 रा.केर्ली ) हा जागीच ठार झाला.हा प्रकार शनिवार दि.31/08/2024 रोजी दुपारी एकच्या सुमारास घडला.
अधिक माहिती अशी की,यातील मयत हा कोल्हापूरहुन केर्ली गावाकडे जात होता.तर रत्नागिरीहुन कोल्हापूरकडे जात असलेली बोलेरो गाडी ही रजपूतवाडी येथे हॉटेल ग्रीन जवळ आली असता यांच्यात जोराची धडक झाल्याने मोटारसायकल वरुन जात असलेला कपिल फरफटत जात रस्त्यावर खाली पडून त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने घटना स्थळी त्याचा मेंदू रस्त्यावर पडला होता.त्यामुळे कपिलचा जागीच मृत्यु झाला.
दोन महिन्यापूर्वीच कपिलचे लग्न झाले होते.तो एमआयडीसी फाइव्ह स्टार येथे एका कारखान्यात नोकरी करत होता.आज त्याने कामाची सुट्टी घेतली होती.काही कामा निमित्त कोल्हापूरला गेला होता.ते काम आटोपून परत गावाकडे जात असताना त्याचा अपघात झाला.त्याचे केर्ली गाव जवळच असल्याने त्याच्या भावासह ग्रामस्थ अपघात स्थळी दाखल झाले.या अपघाताची माहिती पोलिसांना मिळाली असता करवीर पोलिस घटना स्थळी जाऊन पंचनामा करून बोलेरो गाडीचा चालक मिंलीद शांताराम सावंत याला पोलिसांनी ताब्यात घेतले.पुढ़ील तपास करवीर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक निवास पवार करीत आहेत.