प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर - कागल तालुक्यातील पिंपळगाव ब्रु.येथे रहात असलेले प्रशांत अशोक कांबळे (वय 45) हे गुरुवार दि.08/08/2024 रोजी दुपारी दोनच्या सुमारास मोटारसायकल वरुन आपल्या गावी येत असताना गाडीचा टायर फुटुन झालेल्या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाल्याने प्रथम कागल येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की, पिंपळगाव येथील प्रदिप कांबळे आणि त्यांची पत्नी संगीता हे आपल्या मोटारसायकल वरुन इंचलकरंजी येथे नातेवाईकांच्याकडे गेले होते.ते परत येत असताना कागल एमआयडीसी परिसरात असलेल्या रेमंण्ड़ चौकात आल्यावर गाडीचा अचानक टायर फुटल्याने खाली पडून जखमी झाले.अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.