प्रेस मीडिया लाईव्ह
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी (दि.08) रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे.या आगीत नाट्यगृहाच्या अर्ध्या भागाच्या वर इमारत जळुन गेली होती.अग्निशामक दला कडुन रात्री उशिराप्रर्यंत आग विझविण्याचे काम युध्दपातळीवर सुरु होते.ही आग इतकी भयानक होती की अग्निशामक जवानांना ही आग विझवायला अडचणी येत होत्या.या नाट्यगृहातील लाकूड सामान फोमच्या खुर्चा व इलेक्ट्रीक वायरिंगमुळे आगीने रौद्ररुप धारण केले.या मुळे केशवराव भोसले नाट्यगृह आगीत भक्षस्थानी पडले.
केशवराव भोसले नाट्यगृहाचा शुक्रवारी जंयती महोत्सव आयोजित केला होता पण त्याच्या आदल्या दिवशीच ही दुर्घटना घडली.शासनाच्या वतीने या ठिकाणी विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांच्या वरील चित्राचे प्रदर्शन भरविण्यात आले होते ते ही लागलेल्या आगीत खाक झाले.आता फक्त दगडी बांधकामाचे शेष उरले आहेत.या घटनेने कोल्हापूर शहरासह जिल्हयातही मोठी खळबळ उडाली आहे.या कोल्हापूर शहराचा सांस्कृतिक वारसा डोळ्यासमोर जळुन खाक होताना नागरिकांच्यातुन हळहळ व्यक्त केली जात असून तर काहीना अश्रु अनावर झाले होते.