बंदुकीचा धाक दाखवला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे उत्सवाच्या मिरवणूकीत नाचत असताना झालेल्या धक्काबुक्कीत एकाला बंदुक काढ़त दहशत माजविणारा रोहित राजू दंडगल (वय 21.रा.दौलतनगर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शनिवारी (दि.17) रोजी उजळाईवाडी परिसराततुन अटक करून त्याच्या कडील 50 हजार रुपये किमंतीची बंदुक जप्त केली आहे.

      अधिक माहिती अशी की, दौलतनगरातील रोहित दंडगल हा 09 ऑगस्ट रोजी बत्तीस शिराळा येथील नागपंचमीची मिरवणूक बघायला गेला होता.त्या मिरवणूकत त्याच्या साथीदारांचा इतर तरुणा बरोबर वाद झाला होता.त्यावेळी रोहित याने आपल्या कडील बंदुक काढ़त दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सहा.पोलिस निरीक्षक निशाणदार यांना मिळाला असता याची खात्री करून तो रोहित दंडगल असल्याची माहिती मिळाली असता उपपोलिस निरीक्षक संदिप जाधव यांच्या पथकाने त्याचा शोध घेत उजळाईवाडी परिसरातुन सापळा रचून त्याला अटल केली.त्याच्या घेतलेल्या अंगझडतीत 50 हजार रुपये किमंतीची बंदुक सापडली.

  ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली  त्यांच्या पथकाने केली.

Post a Comment

Previous Post Next Post