पंधराशे रुपये साठी लाडक्या बहिणीच्या बँकेत पंधराशे चकरा

 लाडक्या भावाचे आदेश बँकेने बसविले धाब्यावर.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - मुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहिण योजना चालू केल्याने आपल्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा होणार म्हणुन आनंदीत होत्या.त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमवा जमव करून बँकेत सादर ही केली रक्षा बंधनच्या अगोदर काही महिलांच्या खात्यावर जमा झाली.पण काही महिलांच्या खात्यावर अजून ही जमा झाले नसल्याने  बँकेत चौकशी करण्यासाठी रोज चकरा मारत आहेत.तरी पण त्यांच्या पदरी निराशा.

यावर कहर म्हणजे पात्र महिलांनी आपले चालू असलेल्या बँकेची कागदपत्रे जोडून ही त्या खात्यात न पडता बंद असलेल्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.त्या साठी काय कराय पाहिजे त्या महिलेस काहीच कल्पना अजूनही नाही.ही योजना लागू करताना मुख्यमंत्र्यांनी अगोदरच सांगितले होते की या योजनेचे पैसे संबंधित पात्र महिलांचे पैसे कोणत्याही परिस्थितीत अन्य कारणासाठी वळवणार नसल्याचे सांगितले होते.आणि त्याच प्रमाणे जिल्हाधिकारी यांनी बँकेच्या संबंधित विभागाच्या  अधिकारी यांच्या बरोबर बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या.पण हे आदेश  बँकांनी धाब्यावर बसवून थकीत कर्जदा लाडक्या बहिणीचे जमा झालेले परस्पर थकीत कर्ज रक्कम जमा करीत असल्याने यामुळे काही  बँका मालामाल होत आहेत.पण लाडक्या बहिणी मात्र नाराज होत आहेत.

यात काही ग्रामीण भागातील महिलांचे प्रमाण जास्त आहे.या साठी लाडक्या बहिणीनी संबंधित विभागाकडे तक्रार करणे गरजेचे असताना त्या गप्पच आहेत.या योजना लागु झाल्या पासून काही महिला एकमेकीकडे तुला मिळालं का असे चौकशी करत आहेत.पण ज्यांना मिळाले त्या आनंदित आहेत.आणि ज्यांना अजून मिळाले नाही त्या मात्र नाराज आहेत.या योजनेचा लाभ कधी मिळणार याची काही लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post