क्रेडिट कार्डाची चोरी करून 54 हजारांला तरुणाला गंडा घातल्या प्रकरणी पोलिसांत चौघांवर गुन्हा.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - एका संशयीत महिलेने घरातील लोकांची नजर चुकवून क्रेडिट कार्डाची चोरी करून टाकाळा परिसरात असलेल्या कृष्णाई पेट्रोल पंपावरुन 54 हजार 637 रुपयांची रक्कम काढ़ुन फसवणूक केल्या प्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी अमिषा नावाची संशयीत महिला ,रिक्षा ड्रायव्हर भाट (रा.कदमवाडी) कृष्णाई पेट्रोल पंपाचा व्यवस्थापक आणि कामगार समाधान पाटील या चौघांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी विनय मधुकर आत्याळकर यांनी शाहुपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.हा प्रकार 23 ऑगस्ट रोजी उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्याळकर यांच्या घरी अमिषा नावाची महिला येऊन आपण एसबीआय बँकेतुन आल्याचे सांगत तुमच्या क्रेडिट कार्डचे लिमीट वाढ़वून देण्यासाठी त्या कार्डाचे व्हेरिफिकेशन करायचे आहे असे सांगून आपल्या जवळ असलेले नवीन एसबीआय  बँकेचे कार्ड दाखविले.जुने क्रेडिट कार्ड बंद करून देत असल्याचे सांगत त्यांना बोलण्यात गुंतवून फिर्यादीची नजर चुकवून टेबलावर ठेवलेले क्रेडिट कार्ड चोरुन संशयीत महिलेने रिक्षातुन पोबारा करून ती टाकाळा येथे असलेल्या पेट्रोल पंपावर गेली.त्या वेळी रिक्षा ड्रायव्हर भाट  याने चोरलेले क्रेडिट कार्ड पेट्रोल पंपावरील कामगार समाधान पाटील यांच्याकडे दिले .त्यावेळी  पंपाचा व्यवस्थापक आणि कामगार या दोघांनी संगनमत करून त्या कार्डाचा वापर करून 54 हजार 637 रुपये परस्पर काढ़ुन ते कार्ड त्या महिलेच्या ताब्यात दिले.त्या कार्डावरुन रक्क्म काढ़ल्याचा मेसेज फिर्यादी च्या मोबाईलवर गेल्याने हा प्रकार उघडकीस आला.

Post a Comment

Previous Post Next Post