प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : मनोज जरांगे शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे कोल्हापूर पोलीसांनी वाहतूक मार्गात बदल,पार्किगची सोय आणि तगडा बंदोबस्त नेमला आहे. जरांगे यांची शांतता रॅली ज्या रोडने जाणार आहे तेथील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे. अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी चौक, पापाची तिकटी ते माळकर तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी शांतता रॅली निघणार आहे. त्यामुळे या रोडवरील वाहतूक अन्य मार्गाने वळवल्याने हा मार्ग केवळ रॅलीसाठी राखीव ठेवला आहे.
हे मार्ग वाहतूकीस बंद..
कोळेकर तिकटी ते मिरजकर तिकटी,सिध्दाळा गार्डन ते खरी कॉर्नर,गांधी मैदान ते खरी कॉर्नर, अर्धा शिवाजी पुतळा ते बिनखांबी गणेश मंदिर, साकोली कॉर्नर ते महालक्ष्मी चौक, गंगावेश ते पापाची तिकटी,सीपीआर चौक ते माळकर तिकटी, महाराणा प्रताप चौक ते महानगरपालिका असे मार्ग वाहतूकीला बंद केले आहेत.
पार्किगची येथे सोय...
दुचाकी वाहनधारकांना चित्रदुर्ग मठ, नेहरु हायस्कुल, प्रायव्हेट हायस्कुल, शाहू स्टेडीयम येथे आपली वाहने उभी करता येतील. तसेच चारचाकी वाहनधारकांनी दसरा चौक, लक्ष्मी जिमखाना, शंभर फुटी रोड, प्रायव्हेट हायस्कुल, खराडे महाविदद्यालय, न्यू कॉलेज, पदद्माराजे गर्ल्स हायस्कुल येथे वाहने पार्क करावीत.
--------------------
असा आहे बंदोबस्त...
रॅली शांततेत पार पडावी, रॅलीसाठी येणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही, महिला, लहान मुले यांच्या सुरक्षेसाठी पोलीसांनी तगडे नियोजन केले आहे. अप्पर पोलीस अधीक्षक, तीन पोलीस उपअधीक्षक, दहा पोलीस निरीक्षक, २५ उपनिरीक्षक, २५० पोलीस कर्मचारी, ५० वाहतूक पोलीस, १०० होमगार्ड जवान असा बंदोबस्त नेमला आहे.
------------