प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - मणेरमळा येथे रहात असलेली परप्रांतिय महिला सीमा सावन चव्हाण (वय 23.रा.मुळगाव मध्यप्रदेश) हिने रहात्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.हा प्रकार शुक्रवार (दि.30) रोजी रात्री साडेसातच्या सुमारास नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्यांनी गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वी मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
----------------------------------------
विषारी औषध घेतलेल्या महिलेचा मृत्यु.
कोल्हापूर - शाहुवाडी तालुक्यातील सावर्डे येथील अनिता संजय गावडे (वय 28) यांचा सीपीआर रुग्णालयात उपचार चालू असताना मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
यातील मयत महिलेने शनिवार (दि.24) रोजी रहात्या घरात विषारी औषध घेतले होते.त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी प्रथम खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे उपचार चालू असताना शनिवारी (दि.31) रोजी सकाळी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.