नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध घेतलेल्या तरुणाचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - पन्हाळा  तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे येथे रहात असलेल्या विजय बळवंत चौगुले (वय 36) याने मंगळवार दि.20/08/2024 रोजी दुपारी साडे पाचच्या सुमारास रहात्या घरात "ग्रामोझोन "नावाचे विषारी औषध सेवन केले होते.त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार चालु असताना गुरुवार दि.22/08/2024 रोजी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की ,यातील मयत हा पोर्ले तर्फ ठाणे येथे आपल्या आई आणि भावा सोबत रहात असून त्याचा आणि चुलत भाऊ व चुलती यांच्यात शेतीच्या कारणातुन गेल्या दीड वर्षापासून वाद आहे.त्याच्या चुलत भावाने आणि इतर नातेवाईकांनी मारहाणीची खोटी केस पन्हाळा पोलिस ठाण्यात करून जास्तच त्रास देऊ लागले अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.चुलत भावाच्या घरातील काही जण अपंग असल्याने याचाच फायदा घेऊन वारंवार त्रास देण्याचा प्रकार होऊ लागल्याने या सर्वाला कंटाळून त्याने चिठ्ठी लिहून त्यात काही जणाच्या नावाचा उल्लेख करून मंगळवारी (दि.20) रोजी विषारी औषध घेतले होते.ती चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.यातील मयत बोलण्याच्या स्थितीत असताना सुध्दा पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही .असा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला.आज सकाळी विजयचा मृत्यु झाल्याचे समजताच संशयीतावर गुन्हें दाखल केल्या शिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे त्याच्या नातेवाईकांच्यात चर्चा होती.यातील मयत हा शेती करत असून तो अविवाहित होता.त्याच्या पश्च्यात आई व एक भाऊ असून तो एमआयडीसी येथे नोकरीस आहे.

Post a Comment

Previous Post Next Post