सीपीआरमध्ये उपचारासाठी आलेल्या तरुणास बेदम मारहाण

 भोसलेवाडी , सदरबाजार परिसरातील तरुणांचे कृत्य

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : भोसलेवाडी येथील सुरेश नावाचा तरुण शुक्रवारी सायंकाळी मारहाणीत जखमी झाला. पोलीसात तक्रार देण्यासाठी तो शाहूपुरी पोलीस ठाण्यात गेला होता. पोलीसांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये पाठवले. दरम्यान मारहाण करणाऱ्या तरुणांना याबाबत माहिती समजल्यानंतर त्यांनी सुरेशला रुग्णालयात गाठून 'आमच्या विरोधात तक्रार देतोस का?' असा जाब विचारत रुग्णालय आवारात पाठलाग करून बेदम मारहाण केली.

   पाठलाग करणाऱ्या तरुणांपासून वाचण्यासाठी सुरेश रुग्णालयातून बाहेर येऊन भाऊसिंग रोडने पळून गेला. शुक्रवारी रात्री आठ आजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेने रुग्णालय आवारात गर्दी जमली होती. याबाबत लक्ष्मीपुरी पोलीसांना समजल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी जमा झाले. त्यांनी जमावाला पांगवले. त्यानंतर मारहाण करणाऱ्या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला,पण तेही पळून गेले. संशयीत हल्लेखोर भोसलेवाडी व सदर बाजार परिसरातील असल्याचे समजते.

   रात्री उशिरापर्यंत पोलीस जखमी सुरेशचा शोध घेत होते. मात्र सीपीआर रुग्णालयात घडलेल्या या प्रकाराची चर्चा रात्री उशिरापर्यंत रुग्णालय आवारात सुरू होती. पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल झाली नव्हती.

________________________________________________

मनोहर राणोजी कांबळे यांना उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल

मनोहर राणोजी कांबळे (63 रा.पोर्ले तर्फ बोरगाव ,ता.पन्हाळा) 9 /8 रोजी सकाळी 11 च्या सुमारास आपल्या रहात्या घरातुन मळी नावाच्या शेतात जावून स्पायकर नावाचे विषारी औषध सेवन करून साडे अकराच्या सुमारास घरी आल्या नंतर कसे तर वाटू लागल्याने दुपारी तीनच्या सुमारास उपचारा साठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post