प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हुपरी येथे टायर दुकान चालक गिरीशकुमार विश्वनाथ पिल्लई (वय 47.रा.हुपरी जवाहर साखर कारखाना.मुळगाव केरळ) ह्याचा गुरुवार दि.29/08/2024 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास जवाहर साखर कारखाना समोर असलेल्या टायर दुकानात अनोळखी व्यक्तीने मारहाण केल्याने झालेया मारहाणीत गिरीशकुमार गंभीर जखमी झाल्याने त्याचे नातेवाई कुणी नसल्याने जखमीला तेथील एका इसमाने आणि पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवार दि.30/08/2024 रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शवविच्छेदनगृहात हलविला असून त्याचे नातेवाईक येथे नसल्याने नातेवाईक आल्या शिवाय शवविच्छेदन करणार नसल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.या घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना पोलिसांनी दिली असता केरळहून त्याचे नातेवाईक कोल्हापूरकडे येत असल्याची माहिती मिळाली .