प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर- कागल येथील विराज रविंद्र म्हाळुंगेकर (वय 4 वर्षे .रा.शाहुनगर,काळम्मावाडी वसाहत ) हा शुक्रवार दि.16/08/2024 रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास घरात खेळत असताना अचानक लाकडी कपाट अंगावर पडल्याने त्याच्या नातेवाईकांनी बेशुध्दावस्थेतून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
अधिक माहिती अशी की ,विराज हा शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास खेळत असताना अचानक त्याच्या घरातील लाकडी कपाट अंगावर पडून जखमी होऊन बेशुध्द पडला .हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्याला उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यु झाला.त्याचे वडील कागल एमआयडीसी येथे इंडो कांऊट येथे नोकरीस असल्याचे समजते.विराज याच्या पश्च्यात आई वडील आणि दहा वर्षाची बहिण आहे.त्याचा अशा प्रकारे मृत्यु झाल्याने त्या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.