प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवार,दि. 14 ऑगस्ट रोजी दू. ३ वा. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे देशभक्तीपर गीतांचा करा ओके गीत गायन सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध क्षेत्रातील व्यक्ती,संस्थांना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक परिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे यांनी दिली .
या कार्यक्रमात दैनिक अप्रतिम चे संपादक रविराज ऐवळे , ( जयसिंगपुर ) महेश कांजुर , गणेश नलावडे , नितिन मस्के , साईराज पाटील शिवराज पोवार वृक्षभ बेलवलकर यांचा व अन्य आदर्श व्यक्ती संस्थाचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे .
प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे ,एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता आय ए . नाईक,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुप्रिया देशमुख ,अँटिकरप्शन च्या पोलीस निरीक्षक अस्मा मुल्ला ,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे ,शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉक्टर निलेश बनसोडे ,डीआरडी चे जिल्हा व्यवस्थापक सचिन पाटणकर ,आंतरराष्ट्रीय स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सतीश पत्की 'जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (माध्यमिक ) एकनाथ आंबोकर ,आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत .