प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - संभाजीनगर परिसरातील नाळे कॉलनी येथे रहात असलेल्या भूषण निळकंठ कुलकर्णी (वय 61) आणि भाग्यश्री निळकंठ कुलकर्णी (वय 57)यांनी गुरुवार दि.15/08/2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.या घटनेची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
अधिक माहिती अशी की,नाळे कॉलनी येथे कुलकर्णी बहिण भाऊ रहात असून ते दोघे ही अविवाहित होते .त्यांच्या आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते.त्यांच्या आठवणीने आज त्यांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.त्यांचे मृतदेह राजाराम तलावात तंरगताना तेथील नागरिकांच्या निदर्शनास आल्याने याची माहिती राजाराम पोलिस ठाण्यास दिली असता पोलिसांनी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करून या दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढ़ुन उत्तरीय तपासणी साठी सीपीआर रुग्णालयात पाठविण्यात आले.