विजेचा शॉक लागून परप्रांतिय मजुराचा मृत्यु.

 

प्रेस मीडिया लाईव्ह 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील शिरगाव येथे रहाण्यास असलेले भागवानसिंह (वय 29.रा.शिरगांव मुळगाव महुबोला ,पोस्ट गवारा ,मध्यप्रदेश) याचा शुक्रवार दि.30/08/2024 रोजी दिडच्या सुमारास चंद्रे येथे आंबेडकर वसाहत जवळ एमएसइबीच्या पोलवर दुरुस्त करीत असताना शॉक लागून खाली पडून जखमी झाल्याने त्याला बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी पावणे चारच्या सुमारास मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

अधिक माहिती अशी की,यातील मयत हा शिरगाव येथील युवराज बापू पाटील हे कॉन्ट्रक्टर असून ते एमएसइबीचे कामे घेत असतात.त्यांच्या परप्रांतिय सात मजूर कामास असून आज चंद्रे येथे यातील मयत हा पोलवर वायर जोडत असताना अचानक विजेचा सप्लाय सुरु झाल्याने शॉक बसून खाली पडला .त्याला तात्काळ प्रथम कं.वाळवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन पुढ़ील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारापूर्वी पावणे चारच्या सुमारास मृत्यु झाला.त्याच्या पश्च्यात आई वडील,पत्नी व एक मुलगा आहे.गेल्या दोन वर्षापासून युवराज पाटील यांच्याकडे मजूर म्हणुन कामाला आहेत.अशी माहिती कॉन्ट्रक्टर पाटील यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post