प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - पाचगाव येथे पवार कॉलनीत रहात असलेला सागर जयसिंग कुंभार (वय 34) याचा मंगळवार दि.20/08/2024 रोजी दुपारी चारच्या सुमारास त्याचा भाऊ वैभव जयसिंग कुंभार याने आपल्या रहात्या घराच्या अंगणात दुचाकीच्या चेनवेलच्या पंख्याने मारहाण केल्याने त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाला आहे.
अधिक माहिती अशी की ,यातील मयत आणि आरोपी नात्याने सख्खे भाऊ असून आरोपीने मद्य प्राशन केल्याचे समजते.काही दिवसापूर्वी आरोपीने आपल्या आईस मारहाण केल्याने ती आपल्या भावाच्या घरी गेल्या होत्या.आरोपी हा सरकारी कर्मचारी असून सध्या संस्पेट असून त्याला दोन मुले असून पत्नी माहेरी रहात असल्याची माहिती मिळाली.तर यातील मयत हा विवाहित असून त्याला चार वर्षाचा मुलगा आहे .तो खाजगी अकौटंटची कामे करत होता.त्याची पत्नी रक्षाबंधन सणासाठी गावी गेल्या होत्या.हे दोघेच आज घरी होते.यातील आरोपी वैभव याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.