प्रा.डाँ श्री रामचंद गोविंद पवार यांना विशेष सेवा रत्न पुरस्कार प्रदान



प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर - पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्युज एक्सप्रेसच्या राज्यस्तरीय  पुरस्कार सोहळा रविवार दि.25ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.मुंबई.येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथे आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील संचालक  प्रा.डॉ. श्रीरामचंद्र गोविंद पवार  यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना  विशेष सेवा रत्न पुरस्कार  प्रदान करण्यात आला. 

या झालेल्या आगळ्या वेगळ्या पुरस्काराने आनंद व्यक्त करुन पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक श्री.मेहबुब सर्जेखान यांचे आभार मानून कृतद्न्यता व्यक्त केली. या वेळी पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रसाद कुलकर्णी,प्रमुख पाहुणे सागर बोरांडे,श्री.फिरोज मुल्ला,श्री.संतोष जंगम( स्वामी )प्रमुख उपस्थिती सौ. प्रमोदिनी मारुती माने यांच्यासह  इतर मान्यवर आणि कोल्हापुर जिल्हा प्रतिनीधी श्री.मुरलीधर कांबळे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post