बेकायदेशीरपणे सील केलेल्या घराचा ताबा घेतल्या प्रकरणी पती पत्नीवर पोलिसांत गुन्हा.

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -  राजोपाध्येनगरातील मधुकर सदाशिव कुंभार आणि लता मधुकर कुंभार यांनी आयडीबीआय बँकेकडुन मालमत्ता तारण ठेऊन गृहकर्ज घेतले होते.त्याची वेळेवर परत फ़ेड न केल्याने त्यांची तारण ठेवलेली मालमत्ता  बँकेने सील केली होती.या पती पत्नीनी सील केलेली मालमत्ता परत  घेण्यासाठी त्याचे सील तोडून कब्जा केल्या प्रकरणी आयडीबीआय बँकेचे शाखाधिकारी सस्मित कुबेर यांनी कुंभार पती पत्नीच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

 या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली की,राजोपाध्येनगर येथे कुंभार यांची स्वमालकीची मालमत्ता असून त्या मालमत्ता तारण ठेऊन आयडीबीआय  बँके कडुन गृहकर्ज घेतले होते.त्याचे हप्ते थकीत असल्याने सदर मालमत्ता सील केली होती.या मिळकतीची पाहणी करण्यासाठी  बँकेचे अधिकारी गेले असता सील केलेली मालमत्ता कुंभार पती पत्नीनी बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केल्याचे दिसून आल्याने त्यांच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post