मांजरवाडी येथे तरुणाची आत्महत्या.

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील मांजरवाडी येथे रहात असलेल्या महेश मारुती येरुडकर (वय 34) याने बुधवार दि.28/08/2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास शेतातील घरात लाकडी तुळईला लाल रंगाच्या दोरीने गळ्यात गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी  बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा पावणे दोनच्या सुमारास उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

यातील मयत हा शेती करीत असून त्याच्या पश्च्यात पत्नी,एक मुलगा ,दोन मुली ,आई वडील आणि एक भाऊ आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण समजू  शकले नाही.

----------------------------------------

  चव्हाणवाडी येथे झालेल्या अपघातात तिघे जखमी .

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील चव्हाणवाडी फाटा येथे बुधवार दि.28/08/2024 रोजी सकाळी  साडे आठच्या सुमारास फोर चारचाकी आणि मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात प्रदिप मलीक (वय35रा.चव्हाणवाडी) सुनिल सुभाष मार्ले(वय35.रा.वसगडे ) आणि दिलीप पूर्ण नाव समजू शकले नाही (वय25.रा.मुडशिंगी) हे तिघे जण जखमी झाल्याने त्यांना 108 रुग्णवाहिकेतुन उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

-------------------------------------

  अपघातात मुलगी ठार.

कोल्हापूर - फुलेवाडी परिसरातील अंबाई ट्य्ंक येथे रहात असलेली शिवानी संतोष पाटील (वय 18) हिचा बुधवार दि.28/08/2024 रोजी सकाळी दहाच्या सुमारास सुदर्शन पेट्रोल पंपासमोर झालेल्या अपघातात गंभीर  जखमी झाल्याने तिला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

----------------------------------------

गव्याने दिलेल्या धडकेत एक जखमी.

कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे येथील बळवंत सखाराम शेटके (वय 50) हे बुधवार दि.28/08/2024 रोजी सकाळी सातच्या सुमारास शेतात काम करीत असताना त्यांना गव्याने धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी बेशुध्दावस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले .या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post