प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर : राजर्षी शाहू स्मारक भवन येथे परिवर्तन फाउंडेशन तर्फे भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य राष्ट्रसेवा सन्मान पुरस्काराचे वितरण व देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. धनंजय पठाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रंसगी को.म.न.पा. नगर विकास उपसंचालक धनंजय खोत, भोगावती महाविद्यालयाचे प्रा. माधव पोवार, दिगंबर कुलकर्णी, जिल्हा परिषद डी.आर.डी.ए. चे व्यवस्थापक सचिन पाटणकर, दैनिक अप्रतिम चे संपादक रविराज ऐवळे , आरोग्य सेविका सुरेखा कांबळे, वडणगेच्या लोकनियुक्त सरपंच संगीता पाटील,आदित्य कुंभार, संजय गुदगे उदयसिंह मिसाळ , इम्राण सनदी , महेश कांजुर , गणेश नलावडे , नितिन म्हस्के आदींना राष्ट्रसेवा सन्मान पुरस्कार देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक परिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष अमोल कुरणे, पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष आठवले, जिल्हाध्यक्ष जयसिंग कांबळे, निवासराव सूर्यवंशी, चंद्रकांत दिंडे, राज कुरणे, गीता डाकवे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील सामंत यांनी केले.